इचलकरंजीत दारु पिण्यास नकार दिल्याने मित्रावर केला हल्ला

सलमान अन्सारी व राजकुमार महातो हे दोघे मित्र असून शुक्रवारी धुळवडीची सुट्टी असल्याने दोघे राहण्यास असलेल्या महात्मा गांधी पुतळा हनुमान मंदिर परिसरातील रुमवर दुपारीच दारू पिट बसले होते. दुपारी साडेचार वाजता झोपून उठल्यानंतर राजकुमार याने पुन्हा सलमान याला पुन्हा दारु पिण्यास सुरुवात करुया असे सांगितले. त्यावर सलमान याने दारु पिण्यास नकार दर्शविला. दारु पिण्यास नकार दिल्याने चिडलेल्या राजकुमार याने सलमानला शिवीगाळ करत हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली.

तसेच रुममध्ये भाजी कापण्यासाठी ठेवलेला चाकू घेऊन सलमानच्या गळ्यावर वार केला. त्यामुळे सलमान हा जखमी झाला असून त्याच्यावर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर घटनेनंतर नातेवाईकांकडे पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या राजकुमार याला गावभाग पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले.