मराठा आंदोलनाचा पुन्हा एकदा एल्गार…..

लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालादिवशीच, 4 जून रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत मराठा आंदोलन सुरु होईल. मनोज जरांगे पाटील बेमुदत उपोषणाला सुरुवात करणार आहेत. उपोषण स्थळी राज्यातील गरजवंत समाज एकत्रित जमणार आहे.गरीब समाजासाठी माझा लढा सुरू आहे. या लढ्यात सर्वच समाज एकत्रित येणार आहे, असे जरांगे पाटील यांनी सांगितले.

माझ्या आंदोलना मागे कोणीही नाही. फुस लावण्याचा तर प्रकार लांबच राहिला. काहीही कारणं जोडू नका. इथ मराठा एक झालेला आहे. आंदोलन हे सरकारच्या फायद्याचे होत असतात. मात्र माझे आंदोलन समाजासाठी आहे. त्याचा फायदा समाजाला झाला आहे. सरकार आणि विरोधी पक्षाला कुठलाच फायदा झाला नाही, असे ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात देखील मराठा समाजाने ताकदीने मतदान करा. मराठा समाजाने लेकरं डोळ्या समोर ठेवून निवडणुकीत मतदान करा. नाशिकच्या उमेदवाराला माझा पाठिंबा नाही. माझा कोणालाच पाठिंबा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. समाजाने मला उपोषण करू नये असे सांगितले. मात्र मला समजालाच न्याय द्यायचे आहे म्हणून उपोषण करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.