ख्रिसमससह न्यू इयर सेलिब्रेट करणाऱ्यांसाठी खुशखबर असून यंदा हे सेलिब्रेशन जोरात होणार आहे. २४, २५ आणि ३१ डिसेंबरला पहाटे ५ वाजेपर्यंत मद्य विक्री सुरू राहणार आहे.यात हॉटेल, रेस्टॉरंट, परमीटरूम, ऑरकेस्ट्रा बार हे देखील पहाटे ५ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबद्दलचे आदेश आज गृहविभागाने काढले आहेत. २४, २५ आणि ३१ डिसेंबर ते दुसऱ्यादिवशी पहाटे ५ पर्यंत सर्व आस्थापना सुरू ठेवण्यास परवानगी मिळाली आहे. त्यामुळे न्यू इयर आणि ख्रिसमसचं सेलिब्रेशन करता येणार आहे.
मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे, नागपूरमध्ये पहाटे ५ वाजेपर्यन्त ख्रिसमस आणि न्यू इयर सेलिब्रेशनची पार्टी केली जाणार आहे. या तिन्ही दिवशी वाईन शॉप मध्यरात्री १ पर्यंत सुरू राहणार आहे. तर बियर बार हे पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. याशिवाय आउटडोअर म्युजिक कॉन्सर्टसाठी देखील रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदा थर्टीफस्ट जोरदार पद्धतीने साजरा होणार असल्याचं बघायला मिळत आहे.