यड्रावात कारखान्याला आग लाखोचे नुकसान…

पार्वती औद्योगिक वसाहतीमधील कारखान्याला शॉर्टसर्किटने आग लागून सुमारे १९ लाख ३९ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले. ही घटना शनिवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास घडली. याबाबतची वर्दी जयदीप पाटील (रा. शांतीनगर, इचलकरंजी) यांनी शहापूर पोलिसांत दिली आहे.
जयदीप यांचा पार्वती औद्योगिक वसाहतीमध्ये प्लॉट नं. १४४ मध्ये श्री पार्श्व एंटरप्रायजेस नावाच्या प्लेटिंग
पावडर काटिंग फॉस्फेटिंग करण्याचा कारखाना आहे. सकाळी कारखाना उघडल्यानंतर मेन स्विच चालू केल्यानंतर कोपऱ्यातील एका वायरला शार्टसर्किटने आग लागली. या आगीत रेक्टीफायर मशिन, प्लेटिंग बॅरेल मशिन, झिंग मेटल १६ नग, डायर मशिन, कच्चे पक्के केमिकलचा स्टॉक, कोटिंग पावडरचा स्टॉक, सीसीटीव्ही कॅमेरे, इलेक्ट्रिक वायरिंग, ब्लोअर मशिन, लोखंडी कपाटे खाक झाली. कारखान्यातील अग्निरोधक यंत्र मागवून आग विझविण्यात आली.