सांगोला तालुक्यात प्रथमच आयोजित केलेल्या गरबा दांडिया स्पर्धेला उदंड प्रतिसाद

भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत मित्र परिवाराच्या वतीने छ. शिवाजीनगर नवरात्रोत्सव मंडळ, छ. शिवाजीनगर सांगोला संचलित दांडिया गरबा नाईट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सांगोला तालुक्यात पहिल्यांदाच आयोजित केलेल्या दांडिया गरबा नाईट स्पर्धेला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत मित्र परिवाराच्या बतीने छ. शिवाजीनगर नवरात्रोत्सव मंडळ, छ. शिवाजीनगर सांगोला संचलित दांडिया गरबा नाईट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दांडिया गरबा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरच्या स्पर्धा २२ २३ आणि २४ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ६ ते १० या वेळेत सांगोला शहरातील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर आयोजित करण्यात आल्या आहेत.

या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट दांडिया जोडी ७००१ रुपये बक्षीस, सर्वोत्कृष्ट गरबा जोडी ७००१ रुपये बक्षीस, सर्वोत्कृष्ट दांडिया ग्रुप ७००१ रुपये बक्षीस, सर्वोत्कृष्ट दांडिया ग्रुप ७००१ रुपये बक्षीस अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. सदर कार्यक्रमास उपस्थित राहणान्या महिलांसाठी लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. २२ ऑक्टोंबर रोजी आटा चक्की, मायक्रो ओव्हन, मिक्सर, २३ ऑक्टोंबर रोजी तीन अँड्रॉइड मोबाईल, २४ ऑक्टोंबर रोजी ३ पैठणी साडी अशी लकी ड्रॉ बक्षिसे देण्यात येणार आहेत.

२२ ऑक्टोंबर रोजी गरबा दांडिया नाईट स्पर्धेचे मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले. गरबा दांडिया स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला. नागरिकांनी गरबा दांडियाचा मनमुराद आनंद लुटला. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये पहिल्या दिवशी कार्यक्रम पार पडला. छ. शिवाजीनगर नवरात्रोत्सव मंडळ, छ. शिवाजीनगर सांगोला या मंडळाने आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासली • आहे. या दांडिया गरबा नाईट स्पर्धा यशस्वी करण्यासाठी छ. शिवाजीनगर नवरात्रोत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत.