आकाशात घिरट्या घालणाऱ्या ड्रोन ने सांगोल्यातील नागरिक भयभीत

गेल्या आठवड्याभरापासून सांगोला तालुक्यात रात्री आकाशात घिरट्या घालणाऱ्या ड्रोनने थैमान घातलेले पाहायला मिळत आहे. आठवड्याभरापासून सांगोला तालुक्यात आकाशामध्ये रात्री दिसणाऱ्या ड्रोनमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच अनेक अफवा देखील पसरत आहेत. ड्रोनद्वारे पाहणी करून चोरटे चोऱ्या करत असावेत अशा प्रकारच्या एक ना अनेक अफवा पसरत आहेत. तालुक्याभरामध्ये आकाशात फिरणारे ड्रोन आता सांगोला शहरात देखील दिसू लागले आहेत त्यामुळे शहरातील नागरिक भयभीत झाले आहेत. पोलीस प्रशासनाने कसोशीने चौकशी करून याबाबत तात्काळ खुलासा करावा अशी मागणी सध्या जोर धरत आहे.