वाळुज मधील कार्यकर्त्यांनी केला वैभव पाटील गटात प्रवेश!

विधानसभा निवडणुका या तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत. त्यामुळे नेतेमंडळींची निवडणुकीची लगबग सुरू असलेली पाहायला मिळतच आहे. कोणत्या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार याविषयी चर्चांना उधाण आलेले आहे. एकूणच विधानसभा निवडणुकीचे राजकीय वातावरण तापू लागले असताना वाळूज मधील साळुंखे वस्तीवरील बाबर गटातील ग्रामपंचायत सदस्य अनेक कार्यकर्ते यांनी आज पाटील गटात जाहीर प्रवेश केला.

वैभव पाटील यांच्या कामाचा धडाका व सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची पद्धत यावर विश्वास ठेवून प्रवेश केला. येणाऱ्या काळात मतदारसंघातील प्रश्नांना वैभव पाटीलच सोडवू शकतात असे यावेळी साळुंखे वस्तीवरील जनतेने मत व्यक्त करत सांगितले. यावेळी विश्वास साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर शेठ साळुंखे, राम साळुंखे, बालाजी बाबर, महादेव गुजले, विकास गुजले, गणेश साळुंखे, नरेश साळुंखे उत्तम साळुंखे, विकास चव्हाण, दिलीप साळुंखे, सतपाल गुजले, आकाश साळुंखे, हनुमंत गुजले, अक्षय गुजले, सागर साळुंखे, सुनील पाटील यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.