पेठनाका उड्डाणपुलाच्या खालील रस्त्यावर पाण्याचे अंडरग्राउंड….

पेठ उड्डाणपुलाखाली वर्षानुवर्षे पाणी; वाहनधारकांना कायमची डोकेदुखी बसथांबा, सेवा रस्ता आणि बोगद्यामध्ये पाणी साचून पुणे-बंगळुरू महामार्गाच्या पेठनाका उड्डाणपुलाच्या खालील रस्त्यावरील पाण्याची अंडरग्राउंड व्यवस्था नसल्याने वर्षांनुवर्षे याठिकाणी तसेच सेवा रस्त्यावर व शिराळा बाजूच्या बसथांब्यावर पाऊस पडल्यावर तळेच्या तळे साचते.

संबंधित महामार्गाच्या प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले असून, येथील ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत आहेत. २००४ साली पेठनाका येथे उड्डाणपूल बांधला मात्र उड्डाणपुलाखालून जाणाऱ्या रस्त्यावरील पाणी ओढ्याला वाहून जाण्याची सोय मात्र केली नाही.पेठ उड्डाण पुलाची मुळातच उंची कमी आहे.मोठ्या वाहनांना इथे वळसा देखील घेता येत नाही,

तसेच याठिकाणी अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात पाणी साचून वाहतुकीस अडथळा होत, असून सबंधित महामार्ग प्रशासन व कंत्रादारांकडून इथे पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.