पेठवडगावमध्ये होणार बैठक!

जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे राहण्यासाठी हातकणंगले लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाची एकजुट दिसणार आहे, असा विश्वास इचलकरंजीसह हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील मतदारसंघातील दाखवून देण्यासाठी इचलकरंजी व हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील मराठा समाजातील समन्वयक व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक इचलकरंजी येथील शिवाजी उद्यान येथे पार पडली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी येथे झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावागावातून किती उमेदवार उभे राहतील याची चर्चा करण्यात आली. तसेच पुढील दिशा ठरवण्यासाठी हातकणंगले मतदारसंघातील तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक लवकरच पेठवडगाव ता. हातकणंगले येथे घेण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठा महासंघाचे अध्यक्ष संतोष सावंत होते.

यावेळी पुंडलिक जाधव, पै. अमृत भोसले, अरविंद माने, नितेश पाटील, वैभव खोंद्रे, मोहन मालवणकर, विजय मुतालिक, शिरोळ येथील महिपती बाबर, सागर धनवडे, धनंजय पाटील, शहाजी भोसले, रामचंद्र भोसले, सुनिल इंगवले सरकार, अनिल हुपरीकर, टाकवडे येथील शिवाजी काळे तसेच भारत बोंगार्डे, सुरेश कापसे, अमरजीत जाधव, भरत खडसारे, प्रवीण केर्ले, संजय चोपडे उपस्थित होते.