सिंघम अगेनमधील फर्स्ट लूक आउट!

रोहित शेट्टीचा सिंघम अगेन हा चित्रपट या वर्षातील बहुचर्चित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण, रणवीर सिंह, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, करीना कपूर आणि अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करण्यासाठी अजय देवगणचेही प्रयत्न सुरू आहेत. दिग्दर्शक रोहित शेट्टीने अजय देवगणचा फर्स्ट लूक पोस्ट केला आहे. या लूकमध्ये आधीच्या बाजीराव सिंघमचा दरारा दिसून येत आहे. 

रोहित शेट्टीने शेअर केलेल्या फोटोमध्ये अजय देवगण जवळ लष्कराचे काही जवान उभे असल्याचे दिसत आहे. त्यांच्या हातात शस्त्रे दिसत आहे. तर, सभोवताली बर्फाच्छिद पर्वत दिसत आहे. रोहित शेट्टीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, बाजीराव सिंघम एसएसपी एसओजी स्पेशल ऑपरेशन ग्रुप सोबत. जम्मू-काश्मीर पोलीस…सिंघम अगेन…लवकरच.