शहरातील दाटीवाटीचा परिसर असलेल्या महाल परिसरातील झेंडा चौकाजवळ एका कारचालक तरुणाने तीन जणांना उडविले. कारचालक आणि त्याच्यासोबत गाडीत बसलेले त्याचे इतर दोन सहकारी मद्यधुंद अवस्थेत होते, गाडीत दारूच्या बाटल्या ही सापडल्या आहेत. या घटनेत पायी जाणारे महिला, पुरुष आणि लहानशा ३ महिन्याचा चिमुकला जखमी झाले असून बाळाची अवस्था गंभीर असल्याची माहिती.
कार मधील एकाला जमावाने ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. तर कार मधील इतर सर्व पळून गेले आहे. महाल परिसरातील झेंडा चौकात झालेल्या अपघात प्रकरणी पोलिसांनी कार मधील तीनही तरुणांना ताब्यात घेतले आहे… त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे कार मध्ये दारूचे बॉटल्स आणि काही अमली पदार्थ.