Maharashtra Board 10th Result 2024 : आज जाहीर होणार दहावीचा निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून राज्यभरात दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. 1 मार्च ते 26 मार्च 2024 यादरम्यान दहावीची परीक्षा झाली. विशेष म्हणजे दरवेळीप्रमाणे यंदाही राज्यातील दहावीच्या परीक्षा कॉपीमुक्त पार पडल्या. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांसह पालक दहावीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहताना दिसले. शेवटी आज दुपारी 1 वाजता दहावाची निकाल हा जाहीर केली जाईल. सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद पार पडेल. या पत्रकार परिषदेमध्ये बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी हे विभागीय टक्केवारी जाहीर करतील. त्यानंतर दुपारी एक वाजता प्रत्यक्षात विद्यार्थी आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहू शकणार आहेत.

दहावीचा निकाल जिथं पाहणार त्या वेबसाईटची यादी  

  1. www.mahahsscboard.in
  2. www.mahresult.nic.in
  3. www.msbshse.co.in

कसा पाहाल निकाल? 

स्टेप 1 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या mahresult.nic.in या वेबसाईटला भेट द्या. 

स्टेप 2 : होमपेजवरील दहावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा. 

स्टेप 3 : तुमच्या लॉगीन डिटेल्स, परीक्षा क्रमांक, आईचं नोंदवा.

स्टेप 4 : स्क्रीनवर तुमचा निकाल उपलब्ध होईपर्यंत थांबा. 

स्टेप 5 : निकाल उपलब्ध झाल्यानंतर तो पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाऊनलोड करा किंवा त्याची प्रिंट आऊट घ्या. 

दहावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीनं जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याची छापील प्रत काही दिवसांनतर त्यांच्या संबंधित शाळांमध्ये उपलब्ध होईल.