‘डान्स दीवाने’ या कार्यक्रमाने सलग साडे तीन महिने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं. आता या कार्यक्रमाचा दिमाखदार महाअंतिम सोहळा पार पडला आहे. गौरव-नितीन या कार्यक्रमाचे विजेते ठरले आहेत. माधुरी दीक्षित आणि सुनील शेट्टी या कार्यक्रमाचे परिक्षक होते. पाच जोड्यांना मागे टाकत गौरव शर्मा आणि नितिनने ‘डान्स दीवाने 4’च्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.
‘डान्स दीवाने’ या कार्यक्रमाने साडे तीन महिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आता या कार्यक्रमाला विजेता मिळाला आहे. कार्यक्रमाच्या टॉप 6 फायनलिस्ट जोड्यांमध्ये ट्रॉफीसाठी चांगलीच चढाओढ पाहायला मिळाली. गौरव आणि नितिन या कार्यक्रमाचे विजेते होते. दोघांनी संपूर्ण सीझन गाजवला आणि प्रेक्षकांची मने जिंकली. दिल्लीत राहणारा गौरव 22 वर्षांचा आहे. तर बंगळुरूमध्ये राहणारा नितिन फक्त 19 वर्षांचा आहे. नितिन आणि गौरवने ‘डान्स दीवाने’साठी वेगवेगळ्या ऑडिशन दिल्या होत्या. पण पुढे एकत्र परफॉर्म केलं आणि विजेते होऊनच कार्यक्रमातून बाहेर पडले.
गौरव आणि नितिन दोघेही वेगवेगळ्या डान्स फॉर्मवर माहीर आहेत. त्यामुळे नितिन आणि गौरव जेव्हा एकत्र आले तेव्हा दोघांनीही आपल्या परफॉर्मेंसने सर्वांना थक्क केलं. गौरव आणि नितिनला ट्रॉफीसह 20 लाख रुपये मिळाले आहेत. नितिन आणि गौरवला एकमेकांची भाषा समजत नसली तरी त्यांना नृत्याची भाषा मात्र चांगलीच समजते. दोघे पूर्ण सीझन एकमेकांसोबत नृत्याचा माध्यमातून बोलत असे.