विधानसभेच्या समीकरणासाठी धडपड…….

लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच विधानसभेची राजकीय समीकरणे जुळविण्यासाठी कुरघोडी सुरू आहे. सांगली विधानसभेसाठी काँग्रेसमधून दावा करणारे पृथ्वीराज पाटील यांनी कार्यकर्त्यांसाठी स्नेहभोजन मेळावा घेतला. त्याला या विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांच्या गटाची अनुपस्थिती होती.

असेच राजकारण भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात सुरू आहे. या मतदारसंघात इच्छुक असलेल्या राहुल महाडिक यांनी निशिकांत पाटील यांच्यावर गद्दारीचा ठपका ठेवला आहे. लोकसभेतील कामगिरीवरून विधानसभेची उमेदवारी ठरणार आहे. त्यामुळे एकमेकांना टार्गेट करीत प्रत्येकाकडून विधानसभेची समीकरणे जुळविण्यासाठी धडपड सुरू आहे.