लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा झटका बसणार! महागाई भत्ता संदर्भातली मोठी अपडेट

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी DA (महागाई भत्ता) वाढीवर महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात केंद्र सरकारने महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवला त्यानंतर एकूण DA ५० टक्क्यांवर पोहोचला असून यानंतर DA शून्य होणार आल्याची अटकळ बांधली जात होती मात्र आता अलीकडच्या काळात तसं होताना दिसत नाही.केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता शून्य होणार नसून DA वाढीची मोजणी ५० टक्क्यांच्या पुढे सुरूच राहील.

यासाठी अद्याप कोणताही निश्चित नियम नसून बेस इयर बदलल्यावर DA मोजणीचा नियम बदलला होता. पण आता इयर बदलण्याची गरज नाही आणि तशी कोणतीही शिफारस केली नसल्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA वाढीची पुढील गणना केवळ ५० टक्क्यांच्या पुढे असेल.केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवीन अपडेट म्हणजे की अद्यापही कामगार ब्युरोने गेल्या दोन महिन्यांपासून AICPI निर्देशांकाची आकडेवारी जाहीर केलेली नाही. अशा परिस्थितीत, महागाई भत्त्यात पुढे किती वाढ होईल हे सांगणे अद्याप कठीण असून फेब्रुवारी २०२४ मध्ये महागाई भत्त्याचा डेटा अपडेट केला गेला नाही. जानेवारी २०२४ मध्ये महागाई भत्ता ५० टक्क्यांवर पोहोचला होता त्यानंतर DA शून्यावर आणला जाईल, अशी चर्चा होती.

मात्र, असा कोणताही नियम नसून २०१६ मध्ये बेस इयर बदलले तेव्हाच हे केले गेले होते.अशा स्थितीत, महागाई भत्ता शून्यावर आणला जाणार नाही असे तज्ज्ञांचे मत असून असा कोणताही विचार सध्या केला जात नसल्याचेही सरकारने यापूर्वी स्पष्ट केले. त्यामुळे ही चर्चा का जोर धरत आहे हे सांगणे कठीण आहे. कामगार ब्युरोने सध्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा डेटा जाहीर केला नसून महागाई भत्ता मोजणीची आकडेवारी आता ३१ मे रोजी जाहीर होणे अपेक्षित आहे. त्यामुळे, महागाई भत्त्याचे गणित तसेच राहील, असा अंदाज वर्तवला जात आहे.केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आता जुलै २०२४ मध्ये सुधारणा होईल.

AICPI निर्देशांकाच्या जानेवारीपर्यंतच्या आकडेवारीनुसार डीए १३८.९ अंकांवर आहे म्हणजे महागाई भत्त्याचा स्कोर ५०.८४ टक्क्यांवर पोहोचला आहे, पण कामगार ब्युरो शीटमधून फेब्रुवारीचा डेटा गायब असल्यामुळे कामगार ब्युरो महागाई भत्ता शून्यावर आणत असल्याची अटकळ होती, पण तसं चित्र सध्या दिसत नाही.जुलै ते डिसेंबर महिन्यासाठी महागाई भत्त्यात पुन्हा ४ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. डीएमध्ये ४% वाढ झाल्यास एकूण DA ५४ टक्क्यांवर पोहोचले आणि शून्य होणार नाही. सध्याच्या ट्रेंडनुसार, महागाई भत्ता ५१ टक्क्यांवर पोहोचला असून सध्याच्या स्थितीनुसार आणखी तीन टक्क्यांनी वाढल्यास ५४ टक्क्यांवर पोहोचेल.