कॉफी विथ करण 8 सध्या चांगलंच चर्चेत आहे. करण जोहर या शोचं सुत्रसंचालन करत आहे. कॉफी विथ करण 8 च्या पहिल्याच एपिसोडला रणवीर – दीपिका पाहुणे म्हणुन आले होते.
रणवीर – दीपिकाने या शोमध्ये अनेक खुलासे केले. याच शोमध्ये करण जोहरने एक महत्वाचा खुलासा केला. रणवीर – दीपिका आणि रणबीर कपुरला घेऊन करण जोहर एका गाजलेल्या हिंदी सिनेमाचा रिमेक करणार आहे. हा सिनेमा नक्की कोणता? जाणुन घेऊ.
१९६४ साली आलेल्या या गाजलेल्या सिनेमाचा रिमेक करण जोहर करणार
कॉफी विथ करण 8 मध्ये रणवीरने स्पष्ट सांगितलं की त्याला दीपिकाच्या एक्स – बॉयफ्रेंडसोबत एखाद्या प्रेमकथेत काम करण्यास काहीच अडचण नाही. रणवीरने अर्थात दीपिकाचा एक्स – बॉयफ्रेंड रणबीरचा उल्लेख केला.
रणवीरने हे बोलताच करणने सांगितले की, त्याला रणवीर – दीपिका – रणबीर या तिघांसोबत एका गाजलेल्या सिनेमाचा रिमेक करायचा आहे. हा सिनेमा म्हणजे संगम. संगम सिनेमात एकाच मुलीच्या प्रेमात पडलेल्या दोन जिवलग मित्रांभोवती कथा फिरते, असंही करण जोहरने स्पष्ट केलं.
संगम हा चित्रपट 1964 मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमात राज कपूर, वैजयंतीमाला आणि राजेंद्र कुमार यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट राज कपूर यांनीच दिग्दर्शित केला होता आणि तो ब्लॉकबस्टर ठरला होता.
कॉफी विथ करण 8 च्या रॅपिड फायर राउंड दरम्यान, करण जोहरने रणवीर सिंगला विचारले: “तु आणि दीपिका असलेल्या प्रेम त्रिकोणात, कोणत्या अभिनेत्याला तिसरी भुमिका साकारावी असं तुला वाटतं?”
या प्रश्नावर रणवीरने उत्तर दिले, “रणबीर.”