यंत्रमाग कामगार ३० टक्के बोनसवर ठाम ; अन्यथा संघर्ष अटळ

यंत्रमाग कामगारांनी ३० टक्के बोनस बोनस द्या अन्यथा संघर्षास तयार रहा असे कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या मेळाव्यात कॉ. आनंदा गुरव यांनी जाहीर केले मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी हनमंत लोहार होते. ४ वर्षांपासून मालकांनी कराराची अंमलबजावणी केली नाही. कामगारांचे मालकांनी लाखो लाटले आहेत | कामगारांना महागाई भत्याप्रमाने मजुरीवाढ दिली जात नाही. २०१३ रोजीचा करार मालकांनीच मोडीत काढला आहे. असे कामगार नेते राजेंद्र निकम यानी यावेळी भाषणात बोलताना सांगीतले. ६ नोव्हेंबरला सहायक कामगार आयुक्तांना कृती समितीच्या वतीने ३० टक्के दिवाळी बोनस मिळावा व किमान वेतन कादयाची अमंलबजावणी करावी या व इतर मागण्याचे निवेदन देणार असल्याचे कॉ. भरणा कांबळे यांनी सांगितले. -कामगारानी २०१३ साली महागाई भत्या प्रमाणे ठरल्या प्रमाणे मजूरी फरकासहीत कारखानदारानी द्यावी अन्यथा आंदोलनास तयार राहावे, असा इशारा राजेंद्र निकम यांनी दिला. कॉ. सुनिल बारवाडे, शामराव कुलकर्णी, कॉ. सुभाष कांबळे, शिवानंद पाटील, हनुमंत लोहार, रियाज जमादार, रंगराव बोंद्रे यांनी मनोगत व्यक्त केले.