सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीमध्ये प्रियसी सोबत सेल्फी काढण्यासाठी गेलेला प्रियकर बुडाल्याची घटना घडली. प्रियकर आणि प्रियसी असे दोघेही सकाळी सांगलीतील बंधाऱ्यावर सेल्फी काढण्यासाठी गेले होते. परंतु कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये अचानक वाढ झाल्याने पाणी बंधाऱ्यावरून वाहू लागले. यावेळी प्रियसी मात्र बंधाऱ्यावरून काठावर आली. परंतु प्रियकर त्याच ठिकाणी बंधाऱ्यावरून सेल्फी काढत होता.
पाणी पातळी वाढल्याने संबंधित तरुण देखील काठावर येऊ लागला बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागल्याने त्याचा पाय घसरल्याने आणि अचानक तरुण कृष्णा नदीत बुडाला. घटनास्थळी पोलीस आणि बचाव पथक दाखल झाले असून बुडालेल्या तरुणाचा सध्या शोध सुरू आहे. सांगलीतील गेल्या चार दिवसात ही दुसरी घटना आहे. सांगली जिल्ह्यात गेला आठवडाभर पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळतो अशातच तरुणाचे नसते धाडस त्याचा जीवावर बेतले असा स्थानिकांचे म्हणणे आहे. त्याला कारण असे की पाण्याचा स्तर जसा वाढला तशी प्रेयसी काठावर निघून आली मात्र प्रियकराला सेल्फीचा मोह आवरला नाही तो बांधावर उभा राहून सेल्फी काढण्यासाठी थांबला आणि तोच फोटो त्याचासाठी जीवघेणा ठरला. तरुणालाही कल्पना नसेल की आयुष्यातील शेवटचा फोटो त्याने घेतलाय.