मोदी आणि शाहांच्या उपस्थितीत ही बैठक संध्याकाळी 6 वाजता पार पडेल. लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. मात्र एनडीएनं बहुमताचा जादूई आकडा गाठलाय. त्यामुळे, बहुमतासाठी एनडीएतील घटक पक्षांना सोबत घेऊनच आता मोदींच्या पंतप्रधानपदाचं स्वप्न पूर्ण होणारेय.
तेलुगू देसम पक्षाचे चंद्राबाबू नायडू आणि जनता दल युनायटेडचे नितीशकुमार किंगमेकर बनलेत. त्यांच्या पाठिंब्याविना भाजपला केंद्रात सरकार स्थापन करता येणार नाही. त्यासाठीच आज एनडीएकडून बैठक बोलावण्यात आलीय. चंद्राबाबू नायडू, नितीशकुमार आजच्या बैठकीसाठी उपस्थित राहणारेत. जीतन राम मांझी हे देखील आजच्या बैठकीसाठी उपस्थित असतील.