इचलकरंजीत शाही दसरा थाटात साजरा..

सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्यावतीने येथील श्रीमत ना. बा. घोरपडे चौक (दसरा चौक) येथे सार्वजनिक शाही दसरा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी दसरा महोत्सव समितीचे संस्थापक सुरेशदादा पाटील यांच्या हस्ते आपट्याचे पुजन होऊन सिमोलंघनाचा कार्यक्रम पार पडला या महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी इचलकरंजीचे जहागिरदार श्रीमत नारायणराव घोरपडे सरकार यांचे वारसदार यशवंतराव घोरपडे सरकार होते तर माजी खासदार जयवंतराव आवळे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी स्वागत इचलकरंजी दसरा महोत्सव समिती चे अध्यक्ष मोहनराव माने यांनी तर प्रास्ताविक प्रा मधुकर पाटील यांनी केले. तत्पूर्वी प्रथेनुसार गावभागातील अंबाबाई मंदिरापासून शाही पालखी मिरवणूकीस सुरुवात झाली. मिरवणूकीच्या सुरुवातीला उंट, घोडे, भालदार, चोपदार अष्टप्रधान मंडळ, गोंधळी, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके आणि धनगरी ढोलचा गजर असा भव्य लवाजमा होता. प्रथेप्रमाणे मिरवणूक झेंडा चौक, राजवाडा मार्गे नवचंडीकेचे पूजन होऊन कोहळा फोडण्याचा विधी झाल्यानंतर दसरा चौकात आली.

यानंतर दसरा महोत्सव समितीचे संस्थापक सुरेशदादा पाटील आणि श्रीमंत यशवंतराव घोरपडे सरकार यांच्या हस्ते आपट्याचे पुजन होऊन सिमोल्लघनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी नागरिकांनी जहागिरदार श्रीमंत यशवंत घोरपड सरकार यांना सोने देऊन दसन्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी चिमुकला भास्कर संजय पाटील याने मनोगत व्यक्त केले आभार किरण हवालदार यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. युवराज मोहिते यांनी केले. सकल हिंदुस्त आयोज संघटन राष्ट्रप्रे दुर्गामान यावेळी माजी नगराध्यक्षा अलका स्वामी, माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, बोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, हिंदुराव शेळके, अँड. शिवराज चुडमुंगे रविंद्र जावळे, विश्वास चुडमुंगे आदी उपस्थित होते.