सुनिल महाजन यांचा वाढदिवस साजरा

माजी उपनगराध्यक्ष सुनिल महाजन यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आणि दिव्यांग बांधव आणि निराधार महिला व सर्वसामान्य गोरगरीबांच्या सानिध्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाढदिवसानिमत्त सुनिल महाजन यांना प्रत्यक्ष भेटून तसेच दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.

खासदार धैर्यशील माने यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, उद्योगपती सतिश डाळ्या आदींच्या प्रमुख उपस्थितीत वृध्द निराधार, विधवा, दिव्यांग लाभार्थ्यांना विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. वाढदिवसाचे औचित्य साधत ४०० वृद्ध व विधवांना ब्लॅकेट, ८०० महिलांना दिपावली निमित्त फराळ साहित्य, २०० गरजूंना स्टील टिफीन, २०० दिव्यांगांना स्टील डबे व फराळ साहित्य, ५०० साहेबप्रेमी कार्यकर्त्यांना ब्लॅकेटचे वाटप करण्यात आले.

यावेळी सुनिल महाजन मनमाना अतीत आणि त्यात्या महिलानी अंध आशिर्वादरुपी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी तानाजी पोवार, रविंद्र माने, राहुल आवाडे, रवि रजपुते, संजय कांबळे, उदय बुगड, दीपक ढेरे, विठ्ठल चोपडे, सागर चाळके, पै. अमृत भोसले, प्रसाद खोबरे, धोंडीराम जावळे, भैरुलाल अग्रवाल, विशाल कुंभार, बाळासाहेब कलागते, मनोज साळुंखे, मनोज हिंगमिरे, पांडुनाना बिरंजे, रवी जावळे, राजेश रजपुते, प्रविण खामकर, राहुल खंजिरे, प्रकाश पाटील, नितीन धुत आदी उपस्थित होते…