8 जून रोजी नरेंद्र मोदी घेणार पंतप्रधानपदाची शपथ!

लोकसभेचे निकाल लागले असून भाजपकडे इंडिया आघाडीपेक्षा जास्त जागा आहेत. त्यामुळे त्यांनी सत्तास्थापनेचा दावा केला आहे. इंडिया आघाडीच्या दिल्लीत बैठका सुरू आहेत.नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला असून 8 जून रोजी ते पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील.नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी खास शेजारील देशाच्या राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रण पाठवण्यात आलं आहे.

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना त्यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण पाठवण्यात आलं आहे.

विक्रमसिंघे आणि हसीना या दोघांनीही पंतप्रधान मोदींनी दिलेले निमंत्रण स्वीकारलं आहे. 4 जून रोजी भारताच्या 18व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. नवीन सरकारच्या शपथविधीपर्यंत ते सध्याचे कार्यवाहक पंतप्रधान राहतील.