शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी घेतले पू. भिडेगुरुजी यांचे आशीर्वाद…

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे नूतन खासदार श्री. धैर्यशील माने यांनी सांगली येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या निवासस्थानी येऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.या प्रसंगी पू. भिडेगुरुजी यांनी त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या वेळी धारकरी श्री. राजू पुजारी, श्री. नितीन काळे यांसह अन्य उपस्थित होते.