अलीकडच्या काळात अनेक रस्त्यांची दुरावस्था झालेली पहायला मिळत आहे. सरकार कडून वेळोवेळी निधी देखील मंजूर केला जातो. हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली हे गाव महसुल क्षेत्रात दोन नंबरचे गाव असुन शेतकरी वर्गही मोठया प्रमाणात आहे. गावापासून साधारण ३ किलोमीटर अंतरावर पंचगंगा नदी असुन पाचगाव पाणीपुरवठ्याचा उपसा केंद्र असणारा पाचगाव पाणंद रस्ता हा ग्रामीण मार्ग म्हणून शासन दारी नोंद आहे. शेतकऱ्यांनि नेहमी वा रस्त्यावर वर्दळ असते. पण या रस्त्याची फार दयनीय अवस्था होती. त्यावेळी खासदार निवेदिता माने यांनी या रस्त्याचे खडिकरण मुरमिकरण करून दिले होते. कालांतराने पेयजल पाणी पुरवठ्याची पाईपलाईन करताना पाचगाव पाणंद रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती.
शेतकऱ्यांनि आंदोलन करत उपोषण केल्यानंतर तत्कालीन कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा पाहुन या रस्त्याचे मुरमिकरण करून दिले. तर आ. डॉ.अशोकराव माने यांनीही रस्त्याच्या डांबरीकरणासाठी निधी दिला आहे. आता या पाचगाव पाणंद सत्यासाठी खासदार धैर्यशील माने यांनी पन्नास लाखांचा निधी मंजूर केला असुन येथील सोजी मळा ते खटकोळे मळ्यापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण होणार आहे.
मात्र काही मोजक्याच शेतकऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे रस्त्याचे काम रखडणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे. त्यामुळे आलेला निधी परत जाऊन भविष्यात शेतकऱ्यांणा पुन्हा रस्त्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. पट्टणकोडोली येथील पाचगाव पाणंदीसाठी खा. धैर्यशील माने यांनी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला. परंतु काहीच्या आडमुठ्या धोरणामुळे हा निधी परत जाण्याची वेळ आली. शेतकयांनी याबाबत एकत्रित येऊन तोडगा काढण्याची गरज आहे.