अलीकडे आपण पाहत, ऐकतच आहोत प्रेम विवाहाच्या घटना. अशातच एक हातकणंगले तालुक्यातील प्रेमायुगुलांची चर्चा होतानाचे चित्र पहायला मिळत आहे. प्रेमाचे रूपांतर विवाहबंधनात करायचं म्हणून वयाचा फज्जा ओलांडताच चंदेरी नगरीतील प्रेमीयुगुलांनी धूम ठोकत थेट कुरुंदवाड गाठले.
हातकणंगले तालुक्यातील चंदेरी नगरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या गावातील मामाच्या मुलगीला आत्तीच्या मुलाने पळवून आणले. त्यानंतर कुरुंदवाड नगरीत स्टॅम्प खरेदी करून लग्न सोहळा उरकण्यासाठी भटजीला भेटले. भटजींनी वेळ लागणार असे सांगितल्याने मुलीकडचे कुणीतरी पाहतील. या भीतीपोटी प्रेमी युगुल चार मित्र आणि मावशी, आत्याला घेऊन खिद्रापूर येथे देवदर्शनासाठी गेले.
मात्र, मुलीच्या नातेवाईकांना सुगावा लागताच ५० हून अधिक जणांनी मंदिर आवारात गर्दी करत मुलीचा शोध सुरू केला. मुलगी मिळून येताच तिला भर चौकातच मारहाण करायला सुरुवात केली. तिला मारहाण करत असल्याचे पाहून मुलाने आपली दुचाकी तेथेच टाकून पसार झाला. मित्रांनी ही राजापुरवाडीचा रस्ता धरत पळ काढला. तर आत्या-मावशीने म्युझियम इमारतीत दडून बसत स्वतःचा बचाव केला.
या सर्व घटनेनंतर प्रेम विवाह करण्यापूर्वी देवदर्शनासाठी आलेल्या प्रेमीयुगुलांची नातेवाईकांनी खिद्रापुरातूनच काढलेल्या वरातीची खमंग चर्चा दिवसभर सुरू होती. या घटनेची कोणतीही नोंद पोलिसांत झालेली नाही.