सुभाष कपूर दिग्दर्शित ‘जॉली एलएलबी 3’ (Jolly LLB 3) या सिनेमाच्या शुटींगला सुरुवात केली आहे. दरम्यान या सिनेमात डबल धमाका दिसणार आहे. कारण हर्षद वारसी आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) या दोघांचीही जोडी या सिनेमात दिसणार आहे. जॉली एलएलबीच्या पहिल्या भागात अर्शद वारसी (Arshad Warsi) प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तसेच दुसऱ्या भागात अक्षय कुमार आणि हुमा कुरेशीची जोडी पाहायला मिळाली. दोन्ही सिनेमात सौरभ शुक्ला न्यायाधीशाच्या भूमिकेत पाहायला मिळाले. पण आता तिसऱ्या भागात पुन्हा एकदा अमृता रावची एन्ट्री होणार असल्याची माहिती सांगण्यात समोर येत आहे.
‘हिंदुस्तान टाइम्स’ च्या वृत्तानुसार, जॉली एलएलबी 3 सिनेमात हर्षद वारसीच्या बायकोच्या भूमिकेत अमृता राव दिसणार असून या सिनेमातूनच ती कमबॅक करणार आहे. या तिसऱ्या भागाचं शुटींग राजस्थानमध्ये सुरु झालं आहे. जॉली एलएलबीच्या तिसऱ्या भागातही अमृता राव दिसली होती. या सिनेमात तिने हर्षद वारसीच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली होती. तसेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृता रावचं देखील शेड्युलमध्ये नाव आहे. परंतु अद्याप यावर अमृताकडून कोणत्याही प्रकारचं भाष्य करण्यात आलेलं नाहीये.
