तुम्ही एचडीएफसी बँकेचे (HDFC Bank) ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी कामाची आहे. सध्या विक एंड असताना एचडीएफसी बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची माहिती बँकेने खातेदारांना एसएमएस आणि ई-मेलच्या माध्यमातून दिली आहे. या मेलनुसार बँकेची ऑनलाईन आणि मोबाईल बँकिंग सर्व्हिस दोन दिवस काम करणार नाही. दोन दिवसांतील आजचा एक दिवस संपला आहे. पण आणखी एक दिवस बँकेच्या या सेवा वापरता येणार नाहीत.
मिळालेल्या माहितीनुसार एचडीएफसी बँकेच्या मोबाईल आणि नेटबँकिंगच्या अॅपवर 9 जून आणि 16 जून रोजी काही ट्रान्झिशन्स होणार नाहीत. 9 जून रोजी सकाळी 3:30 ते सकाळी 6:30 दरम्यान ग्राहकांना हे ट्रान्झिशन करता येणार नव्हते. आता मात्र हे ट्रान्झिशन्स सुरळीत झाले आहेत. पण 16 जून रोजी सकाळी 3:30 ते सकाळी 7:30 नेटबँकिंग आणि मोबाईल बँकिंच्या व्यवहारावर निर्बंध असतील.
एचडीएफसी बँकेच्या संकेतस्थळानुसार अकाउंट, डिपॉझिट्स, फंड ट्रान्सफर (NEFT, IMPS, RTGS आणि बँक ट्रान्सफर), ऑनलाइन पेमेंट अशा प्रकारचे ट्रान्झिशन्स 9 आणि 16 जून 2024 रोजी सकाळी 03:30 ते सकाळी 06:30 वाजेपर्यंत या सुविधा वापरता येणार नाहीत. या काळात बँकेचे ग्राहक यूपीएयच्या माध्यमातूनदेखील पेमेन्ट करू शकणार नाहीत. चांगली गोष्ट म्हणजे यातील 9 जून हा दिवस आता संपला आहे. पण आगामी 16 जूनचा विचार करता ग्राहकांनी त्यांची ऑनलाईन बँकिंगचे काम आताच करून घ्यावे, असे आवाहन केले जात आहे.