सांगोला तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेतर्फे आज सोमवार दिनांक २३ ऑक्टोबर २३, रोजी सांगोला तहसीलदार कार्यालयासमोर सांगोला तालुक्यातील सर्व माध्यमिक शिक्षक संघाचे कार्यकर्ते, सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी तहसीलदार साहेबांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले. तहसीलदार साहेबांनी निवेदनाची प्रत शालेय शिक्षण मंत्री यांना फॅक्स पाठवण्याचे आदेश दिले.
महाराष्ट्र शासनाने कंत्राटीकरण करून दत्ताक शाळा योजना संबंधित राज्य शासनाने जाहीर केलेला निर्णय रद्द करणेबाबत संपूर्ण राज्यामध्ये महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ तसेच संलग्न सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ यांच्या वतीने प्रत्येक तालुक्यातील तालुका माध्यमिक शिक्षक संघातर्फे सर्व तहसीलदारांना आज दुपारी तीन ते पाच या वेळेत आंदोलन करून निवेदन दिले.
संघटनेच्या मागण्या – १) बाह्य यंत्रणेद्वारा कंत्राटी पद्धतीने शिक्षक पदे भरण्यासंबंधीचे आदेश रद्द करण्यात यावेत. २) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा दत्तक योजना राबवण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा ३) राज्याचे शाळेच्या शैक्षणिक सबलीकरण व इतर कामासाठी राज्याच्या अर्थ संकल्पामध्ये शिक्षण विभागासाठी राज्याच्या सकल उत्पादनाच्या किमान ६% भरीव तरतूद करण्यात यावी. ४) विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिक्षण अध्ययन-अध्यापन करण्यासाठी शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्याचे आदेश रद्द करावे. ५) शिक्षकाचे कंपनीकरण व कंत्राटीकरण थांबवावे ६) समूह शाळा विकासित करणारे निर्णय रद्द करून राज्यातील कमी पटसंख्याच्या वाड्यावर वस्तीवरील शाळांना संरक्षण द्यावे इत्यादी मागण्या संघटनेतर्फे करण्यात आलेले आहेत.
यावेळी निवेदन देताना सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष भारत इंगवले, उपाध्यक्ष नीलकंठ लिंगे, टीडीएफचे कार्याध्यक्ष मकरंद अंकलगी तसेच तालुकाध्यक्ष अरुण खटकाळे, सचिव विठ्ठल वलेकर, कार्याध्यक्ष धनंजय घोरपडे, सदस्य तानाजी पारसे, आर. एस. भजनावळे सर इत्यादी उपस्थित होते.