अवैध वाळू वाहतूक ; तिघांवर गुन्हा दाखल

सांगोला पोलिसांनी अवैधरीत्या वाळूची वाहतूक कारण्याऱ्यांवर कारवाई करून १३ लाख ७ हजारचा मुद्देमाल जप्त केला . ही कारवाई पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मागर्दर्शनाखाली मंगळवार , १० जून रोजी सकाळी ११ च्या सुमारास झाली असून यातील वाहन चालक व मालकावर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी , मंगळवारी , १० जून रोजी बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीच्या आधारे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचे मार्गदर्शनाखाली पोहवा अस्लम काझी , पोहवा वजाळे , पोका पांढरे असे खासगी वाहनातून सोनंद येथील कोरडा नदीच्या पात्रात गेले असता यल्लम्मा मंदिराचे बाजूस एक जेसीबी टेम्पोमध्ये वाळू भारत असल्याचे दिसून आला. यावेळी पोलीस आपल्या वाहनाच्या दिशेने येत असल्याचे लक्ष्यात येताच टेम्पोचा चालक त्याचे ताब्यातील टेम्पो घेऊन पळून गेला तर जेसीबी पोलीस ठाणेस आणून त्यावरील चालकास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव हेमंत भाऊसो सावंत (वय २८ , रा. कडलास ) याला ताब्यात घेऊन पळून गेलेल्या ४०७ टेम्पो वरील चालकाचे नाव विचारले असता त्याने चालक जितेंद्र काकासो चव्हाण (रा. चव्हाण मला , सोनंद ) तसेच जेसीबी व ४०७ टेम्पो मालक अतुल रामराव पाटील (रा. सोनंद , ता. सांगोला ) असे असल्याचे सांगितले . पोलिसांनी पकडलेला जेसीबी अंदाजे किंमत १० लाख रुपये तसेच व पळवून नेलेल्या ४०७ टेम्पो ३ लाख व त्यातील १ ब्रास वाळू ७ हजार रुपये अशी एकूण १३ लाख ७ हजार रुपयांच्या किमतीच्या वाहनांवर कारवाई केली आहे.