शेतकऱ्यांना खोटा धनादेश देऊन फसवणूक…….

आटपाडी येथील संतोष विठ्ठल मगर यांनी वसंत मारुती नसले (रा. माडगुळे) यांना डाळिंब दिले होते. त्या डाळिंब खरेदीपोटी नवले यांनी मगर यांना धनादेश दिला होता. मात्र तो न वठल्याने त्यांच्याविरुद्ध केस दाखल केलेली होती. याबाबत शेतकऱ्याने व्यापाऱ्याकडे तगादा लावूनही पैसे मिळत नसल्याने अखेर न्यायालयात केस दाखल केली होती.

याप्रकरणी न्यायाधीश विनायक पाटील यांनी आरोपीस तीन महिने तुरुंगवास व २ लाख ३७ हजार ८०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे, अशी माहिती अॅड. चेतन जाधव यांनी दिली. न्यायालयाने फिर्यादी व आरोपी यांचे सर्व पुरावे पाहून यातील आरोपी वसंत मारुती नसले याला तीन महिने तुरुंगवास व २ लाख ३७ हजार ८०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास पुन्हा १५ दिवस साध्या कैदेची शिक्षा सुनावली. फिर्यादीतर्फे अॅड. चेतन व्ही. जाधव यांनी काम पाहिले.