विट्यात नगरपरिषदेतर्फे नागरिकांना मोफत रोपे

माझी वसुंधरा अभियानांतर्गत विटा नगर परिषदेने अभिनव उपक्रम हाती घेतला असून हरित विटा शहर करण्यासाठी नगर परिषदेने विटेकर नागरिकांना झाडांची मोफत रोपे देण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने नवीन पाच नर्सरींची निर्मिती केली आहे.

सध्याचे वाढते तापमान आणि बदलते वातावरण कमी करण्यासाठी शहरे हरित करण्यावर भर देणे आवश्यक आहे. हा उद्देश लक्षात घेऊन विटा नगर परिषदेने शहरात विविध . सार्वजनिक व मोकळ्या ठिकाणी वृक्षारोपण करून हरित पट्टे व बगीचाची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु, नागरिकांनाही आपले शहर हरित करण्यासाठी योगदान देता यावे, यासाठी नगर परिषदेने नागरिकांना मोफत रोपे देण्याचा निर्णय घेतला आहे.