गेली ६० वर्षे सांगोला तालुक्याच्या राजकारणात साळुंखे पाटील परिवाराची मोठी ताकद आहे. कार्यतपस्वी आमदार स्वर्गीय काकासाहेब साळुंखे पाटील यांनी १९६५ पासून सांगोला तालुक्यातील जनतेची सेवा केली आहे.
गेली ३५ वर्षाहून अधिक काळ सांगोला तालुक्यातील जनतेच्या सेवेत अविरतपणे कार्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांची सांगोला तालुक्यात लवकरच जनसंवाद पदयात्रा होणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मधुकर बनसोडे, शहराध्यक्ष तानाजी (काका) पाटील, शिवाजी (नाना) बनकर, शिवाजीराव कोळेकर, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष अनिल (नाना) खटकाळे, महिला आघाडीचे अध्यक्ष सखुबाई वाघमारे व विद्यार्थी आघाडीचे अनिकेत सुरवसे, महम्मद गौस मुजावर, रवी चौगुले, चंचल बनसोडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
या जनसंवाद पदयात्रेतून दिपकआबा तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन नागरिकांच्या व्यथा आणि समस्या जाणून घेणार आहेत. तसेच त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.
सत्ता किंवा पद असो किंवा नसो साळुंखे पाटील परिवारावर प्रेम करणारी आणि विश्वास असणारी जनता हीच आपली संपत्ती या न्यायाने निरपेक्ष भावनेने दिपकआबा साळुंखे पाटील यांनी नेहमीच सांगोला तालुक्याच्या विकासात सिंहाचा वाटा उचलला आहे. वर्षानुवर्षे रखडलेले प्रश्न चुटकीसरशी मार्गी लावणे हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे.
माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील हे आता प्रत्यक्ष जनतेत जाऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत व त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत लवकरच या जनसंवाद पदयात्रेची तारीख आणि मार्ग ठरवण्यात येणार असल्याचेही शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तानाजी (काका) पाटील यांनी सांगितले.