सांगली जिल्हा बँकेचे संचालक अनिल बाबर यांचे जानेवारी महिन्यात निधन झाले. बाबर हे खानापूर तालुका विकास सोसायटी गटातून जिल्हा बँकेचे संचालक होते. त्यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. या जागेवर नवीन संचालकाची निवड करण्यासाठी जिल्हा बँकेने राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवला.
प्राधिकरणच्या मंजुरीनंतर नवीन संचालकाची निवड केली जाणार आहे. बँकेच्या संचालक मंडळाने एकमताने या जागेवर अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर यांची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. या जागेवर बाबर यांचे पुत्र जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांची निवड होणार आहे. या जागेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक कार्यक्रम घोषित होईल. बँकेच्या संचालक मंडळाची बैठकीतच ही निवड होणार आहे. त्यामुळे सुहास बाबर यांची जिल्हा बँकेच्या संचालक मंडळावर निवड निश्चित आहे.