आ. समाधान आवताडे यांच्या पुढाकारातून पंढरपूर- मंगळवेढा या मतदारसंघातील 280 कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बांधण्यात आलेल्या अयोध्या येथील राम मंदिराच्या दर्शनासाठी सोलापूर स्थानकावरून रवाना झाले.प्रत्यक्ष राम मंदिर पाहण्याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली होती त्यासाठी संपूर्ण देशभरामधून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अयोध्या दर्शन सुरू आहे.याचाच एक भाग सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यानाही संधी देण्यात आली.त्यामध्ये अक्कलकोट दक्षिण सोलापूर शहर उत्तर शहर मध्ये मोहोळ पंढरपूर मंगळवेढा अशा सहा विधानसभा मतदारसंघातून कार्यकर्ते सोलापूर स्थानकावरून येथून 20 डब्यांच्या विशेष आस्था रेल्वेने मतदारसंघातील 1345 जण आयोध्येसाठी रवाना झाले.
मंगळवेढ्यातून 280 कार्यकर्ते अयोध्या दर्शनासाठी मार्गस्थ
