सलग तीन दिवस शेअर बाजार राहणार बंद!

गेल्या काही वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गुंतवणुकदारांच्या संख्येत वाढ झालेली असतानाच भारतीय बाजारात मोठी तेजी सुद्धा पहायला मिळत आहे.

भारतीय शेअर बाजाराच्या संदर्भात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. जर तुम्ही बीएसई (BSE) किंवा एनएसई (NSE) मध्ये शेअर्स खरेदी किंवा विक्री करण्याचा विचार करत आहात तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण, आता तीन दिवस तुम्हाला शेअर्सची खरेदी-विक्री करता येणआर नाहीये.

म्हणजेच भारतीय शेअर बाजार सलग तीन दिवस बंद राहणार आहे. जाणून घ्या काय आहे यामागचं कारण आणि कधीपासून कधीपर्यंत शेअर बाजार बंद राहणार आहे.15 जून आणि 16 जून रोजी शनिवार-रविवार आहे. त्यामुळे शनिवार-रविवारी नियमितपणे शेअर बाजारात व्यवहार होणार नाहीयेत.

पण त्यासोबतच सोमवारी म्हणजेच 17 जून रोजी सुद्धा शेअर बाजारात शेअर्सची खरेदी-विक्री करणे शक्य होणार नाहीये. कारण, 17 जून रोजी शेअर बाजार बंद राहणार आहे. 17 जून रोजी बकरी ईद असल्याने शेअर बाजार बंद राहणार आहे. म्हणजेच 15 जून, 16 जून आणि 17 जून असे एकूण तीन दिवस शेअर बाजाराचे व्यवहार बंद राहणार आहेत.