कोल्हापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाटात काल सायंकाळी दरड कोसळल्याने वाहतूक खोळंबली आहे. दरम्यान काल सायंकाळी साडेसहा वाजता कोसळलेली दरड काढण्याचे काम अद्यापही सुरू आहे.यामुळे तब्बल १५ तासांहून अधिक काळ रस्ता बंद असल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. काही काळाने या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. तर यंदाच्या वर्षातील दरड कोसळण्याची ही पहिलीच घटना आहे.वारंवार दरड कोसळत असल्याने घाटातील सुरक्षित प्रवासासह घाटाच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. दरम्यान, घाटातील रस्त्यात सायंकाळी कोसळलेली दरड आणि माती काढून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तात्काळ प्रयत्न सुरू झाले आहेत.
Related Posts
मद्यप्राशन करून हुल्लडबाजी करणाऱ्या दोनशे जणांवर कारवाई!
काल थर्टी फर्स्ट पार्टी तसेच नव वर्षाच्या स्वागतासाठी अनेक पार्ट्यांचे अनेकजणांनी नियोजन केले होते. कोल्हापूर शहरात २०२३ या सरत्या वर्षाला…
कारची दुचाकीला जोरदार धडक! पोलीस जखमी, चालक पसार
सर्किट हाउसजवळ रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास एका चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार वासिम इसाक…
मोहरम आजपासून पीर प्रतिष्ठापना होणार…..
कोल्हापुरातील सामाजिक ऐक्याचे प्रतीक असलेल्या आणि हिंदू-मुस्लीम समाजाने एकत्रित येऊन सण साजरा करण्याची प्रदीर्घ परंपरा असलेला मोहरम सण आज, सोमवारपासून…