आमदार शहाजीबापू पाटील यांनी विकासकामांसाठी आणला साडेचार हजार कोटींचा निधी…

गावागावात नेतेमंडळी गावकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी, गावच्या सर्वागीण विकासासाठी अनेक योजना राबविण्यासाठी निधी मंजूर करून आणतात.महाराष्ट्रात प्रसार माध्यमांमध्ये तसेच समाज माध्यमांवर काय झाडी काय डोंगर, काय हॉटेल हे वाक्य प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले आहे. सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी आमदारकीच्या मतदारसंघातील कामांसाठी कोट्यवधींच्या निधीचा अक्षरश: पाऊस पाडला आहे.

सांगोला विधानसभा मतदारसंघातील रस्ते, सांस्कृतिक भवन, पाण्याच्या योजना, प्रशासकीय भवन, भुयारी गटार, दुय्यम निबंधक कार्यालय, ट्रान्सफॉर्मर, विजेचे खांब, शॉपिंग सेंटर, ईदगाह मैदान यासह सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी सुमारे ४ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.