वसंतदादा घराण्याशी जिव्हाळा, मात्र भाजपशी निष्ठा कायम…

इस्लामपूर काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील लोकसभेत पोहोचले. त्यामुळे भाजप, राष्ट्रवादी, इतर घटक पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या निवडीने शिराळा – वाळव्यातील जुना वसंतदादा गट सक्रिय होऊ लागला आहे. वसंतदादा आणि कदम घराण्यावर कामेरी (ता. वाळवा) येथील भाजपचे नेते सी. बी. पाटील आणि त्यांचे चिरंजीव जयराज पाटील यांचा जिव्हाळा आहे. तरीही भाजपसोबत पक्षनिष्ठा सांभाळण्याचे आव्हान.भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी इतर पक्षातील नेत्यांना भाजपची दारे खुली केली. सी. बी. पाटील यांचे पुत्र जयराज पाटील यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन भाजपमध्ये प्रवेश करण्यास भाग पाडले. तेव्हापासून जयराज पाटील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. दुसरीकडे जयराज पाटील विशेषतः आमदार विश्वजित कदम यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणात पिता-पुत्रापुढे पक्षनिष्ठा सांभाळण्याचे आव्हान आहे.ठाम राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात पिता – पुत्र राजकारणात जिव्हाळा आणि भाजप पक्षावरील निष्ठा यामध्ये मेळ कसा घालतात, याची राजकीय वर्तुळातून उत्सुकता आहे. वडील दिवंगत छगनबापू पाटील यांच्यापासून आजपर्यंत वसंतदादा पाटील यांच्या घराण्याशी आमचे जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. त्याचबरोबर ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचाही आदर्श आमच्यापुढे आहे. असे असले तरी हे संबंध राजकारणापलीकडे आहेत.

आम्ही भाजपसोबत ठाम आहोत.स्वातंत्र्यापासून १९९५पर्यंत कामेरीचे पुत्र दिवंगत छगनबापू पाटील यांनी माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाळवा सी. बी. पाटील, ज्येष्ठ नेते, भाजपतालुक्यात राजकारण केले. कामेरी गाव शिराळा मतदारसंघात येत असल्याने वाळवा तालुक्यातील ४८ गावांमध्ये छगनबापू पाटील यांचा मोठा संपर्क होता. त्यानंतर त्यांचे पुत्र सी. बी. पाटील आणि वसंतदादा कुटुंबातील आमदार मदन पाटील यांनी १५ वर्षे एकत्र राजकारण केले.

सन १९९९ मध्ये सी. बी. पाटील यांनी भाजपकडून इस्लामपूर मतदारसंघात आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यानंतर ते सक्रिय राजकारणात नव्हते. तरीही राज्य पणन संस्था, जिल्हा मध्यवर्ती बँकेवर ते कार्यरत होते. तालुक्यातील भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये त्यांचे नाव अग्रस्थानी आहे. वसंतदादा आणि कदम घराण्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असले तरी त्यामध्ये राजकारण न आणता त्यांनी भाजपचा झेंडा हाती कायम घेतला आहे.