विट्यातील व्यापाऱ्यांसह संघटनांची मागणी सांगलीतील जीएसटी ऑडिट विभाग हलवू नका….

विटा राज्यातील जीएसटी विभागाची फेररचना करण्याबाबत शासनाने प्रस्ताव तयार केला असून त्याअंतर्गत सांगलीत नव्याने सुरू होत असलेला ऑडिट विभाग सांगलीऐवजी कोल्हापूरच्या जीएसटी कार्यालयात सुरू करण्याबाबत प्रस्तावित केले आहे. तसे केल्यास विट्यासह सांगली जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची गैरसोय होणार असल्याने.

सांगली जीएसटी कार्यालयातील ऑडिट विभाग कोल्हापूरला न जोडता त्याचे कामकाज सांगलीचे ऑडिट काम कोल्हापूरला जोडण्याचे प्रस्तावित पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर याठिकाणी सहआयुक्त पदांच्या नवनिर्मितीच्या माध्यमातून ऑडिटची कामे त्या त्या ठिकाणी चालणार आहे. केवळ सांगलीतील ऑडिट काम कोल्हापूरला जोडण्याचे प्रस्तावित केल्याचे दिसत आहे. सध्या सांगली जीएसटी कार्यालयात कार्यरत असलेले दोन उपायुक्त, तीन सहआयुक्त, चार राज्यकर अधिकारी व ३२ राज्य कर तपासणीस अशा ४० ते ४५ कर्मचाऱ्यांच्या जागा सांगली कार्यालयातून संपुष्टात आणून त्या कोल्हापूर कार्यालयात कार्यरत करण्याबाबत आदेश पारित केला आहे.

सांगलीत सुरू ठेवावे, अशी मागणी विटा शहरातील यंत्रमागधारक, किराणा, कापड यासह विविध व्यापारी संघटनांनी केली आहे. यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना याबाबत साकडे घातल्याची माहिती विटा यंत्रमाग संघाचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी दिली.