राहुल महाडिक यांच्या वाढदिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन

28 सप्टेंबर म्हणजेच शनिवारी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाचे संचालक राहुलदादा महाडिक यांचा वाढदिवस वाळवा तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागात मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या वाढदिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे. रेठरेहरणाक्ष जि. प. मतदार संघातील सर्व गावांच्या वतीने कारखाना साईट येथे भव्य रक्तदान शिबिर तसेच वाळवा येथे भव्य राज्यस्तरीय ढोलकी स्पर्धा, इस्लामपूर येथील सद्गुरु आश्रम शाळा येथे भव्य चित्रकला स्पर्धा, सुरूल येथे खुल्या बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.

तसेच येलूर जि. प. मतदारसंघात सर्व शाळांमध्ये खाऊ वाटप, अंगणवाडी सेविका, आशा सेविकांचा सन्मान होणार आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये सर्व रोग निदान शिबिर पार पडणार आहे.