केंद्र शासनाने सन 2024-25 च्या सोयाबीनला 4 हजार 892 रुपयाची हमीभाव जाहीर केला आहे .सध्या सोयाबीन काढण्याचा हंगाम सुरू असून ,शेतकऱ्यांचे सोयाबीन 4 हजार 400 रुपयांनी खरेदी केले जात आहे .शेतकऱ्यांच्या आर्थिक लूट होत आहे. इस्लामपूर येथे राज्य शासनाने तातडीने सोयाबीन खरेदी आधारभूत केंद्र सुरू करून शेतकऱ्यांचचे सोयाबीन 4 हजार 892 रुपये प्रति क्विंटल इतक्या हमीभावाने खरेदी करावा .तसेच, लंम्पी रोगाबाबत तातडीने उपचाराच्या उपाययोजना करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने देण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील यांनी निवासी नायब तहसीलदार धनश्री यादव यांनी निवेदन दिले.
Related Posts
प्रतीक पाटील यांचा झंझावाती प्रचार दौरा! साहेबांनी तालुका राज्यात अग्रेसर ठेवला….
गेल्या 35 वर्षात साहेबांनी काय केले? याची साक्ष त्यांनी आष्टा-इस्लामपूर शहरासह मतदार संघातील गावा-गावात उभा केलेली विकास कामे देतील. मात्र,…
इस्लामपूरचे ‘उरुण ईश्वरपूर’ नामकरण लवकरच !
येथे ८ मार्च या दिवशी ‘शासन आपल्या दारी’ या नियोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ईश्वरपूर दौर्यावर आले होते.…
इस्लामपुरात व्यापाऱ्याला खंडणीसाठी मारहाण..
इस्लामपूर (ता. वाळवा ) येथील व्यापाऱ्याला खंडणीसाठी पुलाची शिरोलीत मारहाण करण्यात आली.याप्रकरणी राहुल शहाजी सातपुते व रोहित शहाजी सातपुते (दोघेही…