बामणी- पारे येथे उदगिरी कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन…

विटा बामणी- पारे (ता. खानापूर) येथील उदगिरी साखर कारखान्याच्या सन २०२४-२५ च्या गळीत हंगामाची तयारी पूर्ण झाली असून सर्व कामे वेळेत पूर्ण करून येणारा गळीत हंगाम वेळेत व पूर्ण क्षमतेने सुरू होत आहे. या गळीत हंगामात ७ लाख टन ऊस गाळप करण्यात होणार असल्याची माहिती कारखान्याचे पूर्ण वेळ संचालक उत्तम पाटील यांनी दिली. बामणी- पारे येथील उदगिरी साखर कारखान्याच्या सन २०२४-२५ च्या गळीत हंगामाचे मिल रोलर पूजन पूर्ण वेळ संचालक उत्तम पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य अभियंता जितेंद्र मेटकरी, निवास पवार, आर. आर. चव्हाण उपस्थित होते. ऊसतोडणी व वाहतुकीचे करार सुरू असून १५ ट्रक, ३३५ ट्रॅक्टर, ४०० अंगद व १५ हार्वेस्टर यांच्याशी करार झाले आहेत. कार्यक्रमास कुलदीप पांढरे, जितेंद्र जाधव, बशीर संदे, रणजीत चव्हाण उपस्थित होते.