राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सोलापूर जिल्हाभरातील ढाबा , हॉटेलच्या अचानकपणे तपासण्या करण्यात येत आहेत. ढाब्यावर दारू विक्री करणे तसेच त्याठिकाणी बसून दारू पिणे कायद्याने गुन्हा आहे.
अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्या ढाब्यांवर विभागाचे लक्ष राहणार असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही अशाच प्रकारे कडक कारवाया केल्या जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिली.
मागील काही महिन्यात उत्पादन शुल्क विभागाने विविध ढाबे, हॉटेलवर कारवाया करून अवैध दारू विक्रीविरोधात कारवाई केली आहे. यात अनेकांना अटक करून दंडही करण्यात आला आहे.