बागायतदारांची विशाल पाटील यांना तर दुष्काळग्रस्त संजयकाकांच्या पाठीशी

लोकसभा निवडणुकीत चित्र विचित्र रूप पहायला मिळाले. आता नेतेमंडळीची विधानसभा निवडणुकीची धावपळ सुरु आहे.
सांगली लोकसभा निवडणुकीत बागायती क्षेत्रातील मिरज, सांगली व पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ व तालुक्यांनी काँग्रेसचे बंडखोर व अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना मताधिक्य दिले. तर कोरडवाहू व दुष्काळी क्षेत्रातील जत, तासगाव व खानापूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा पाठिंबा भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांना मिळाल्याचे निकालाच्या आकडेवारीवरून दिसून आले. सांगलीच्या भौगोलिक रचनेत पश्चिम भाग बागायती आणि पूर्व भाग कोरडवाहू व दुष्काळी आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागातून कृष्णा, वारणा, येरळा व नंदिनी या नद्या व उपनद्या वाहतात. त्यामुळे हा भाग काँग्रेसच्या काळापासून समृद्ध आहे. त्यामुळे या भागात विशाल पाटील यांना मताधिक्य मिळाले आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागातील जत, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर व आटपाडी या तालुक्यांत टेंभू, ताकारी व म्हैसाळ सिंचन योजनेच्या शेवटच्या टप्यात भाजप व शिंदेसेना युतीच्या काळात वेग आला. त्यामुळे या भागात संजयकाका पाटील यांना यांच्याकडे मतदानाचा कल दिसून आला.