महायुतीत खानापूर विधानसभेवरून सुरु झाला……


विधानसभा निवडणुकीची सर्वत्र जोरदार चर्चा चालू आहे. काही नेतेमंडळीनी आपापली तयारी देखील चालू केली आहे.
विधानसभेच्या निवडणुका टप्प्यात आल्या असताना खानापूर मतदारसंघातील वातावरण चांगलेच तापू लागले आहे. मतदारसंघात महायुतीचे घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी, उद्धवसेना व भाजप हे तीनही घटकपक्ष ताकदीने सक्रिय असल्याने इच्छुकांची गर्दी वाढू लागली आहे.

उद्धवसेनेचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर यांची उमेदवारी निश्चित मानली जात असताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी मतदारसंघावर दावा केला. यानंतर आता भाजपचे विधानपरिषदचे गोपीचंद पडळकर यांचे बंधू माजी सभापती ब्रम्हानंद पडळकरांनी विट्यात निर्धार मेळावा घेऊन आपणही तयारीत असल्याचे संकेत दिले.

विटा येथे पडळकर समर्थकांच्या मेळाव्यात गोपीचंद पडळकर व ब्रम्हानंद पडळकर यांनी निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले. खानापूर मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अनिल बाबर हे नेतृत्व करीत होते. त्यांच्या निधनानंतर खानापूरची जागा महायुतीच्या जागा वाटपात शिंदे गटालाच मिळण्याची शक्यता आहे. अॅड. वैभव पाटील व ब्रम्हानंद पडळकर यांनी विधानसभा जागेवर दावा सांगितल्याने महायुतीत वातावरण तापू लागले आहे.