हातकणंगले नगरपंचायत पोटनिवडणुकीसाठी मतदारयादी कार्यक्रम जाहीर…

हातकणंगले नगरपंचायतीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अरुणकुमार जानवेकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या हातकणंगले नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीसह राज्यातील इतर रिक्त झालेल्या सदस्यपदाच्या पोटनिवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून मतदारयादी कार्यक्रम जाहीर झाला आहे. प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यासाठी ३ जुलै ही तारीख असून, प्रारूप मतदारयादीवर हरकती व सूचना यांचा कालावधी ३ ते ८ जुलै आहे. अंतिम प्रभागनिहाय मतदारयाद्या १२ जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहेत. प्रारूप व अंतिम मतदारयादी तयार झाल्यानंतर संबंधित मुख्य अधिकारी यांनी व्यापक प्रसिद्धी द्यावी, असे आवाहन निवडणूक आयोगामार्फत करण्यात आले आहे.