आष्ट्यात दांडिया स्पर्धेत अब्दुललाटचा संघ विजेता

आष्टा येथे वैभवदादा शिंदे युवा मंच, हिरकणी फौंडेशन व जयभारत दुर्गामाता नवरात्र उत्सव मंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या आदिशक्ती दांडिया स्पर्धेत अब्दुललाट (ता. शिरोळ) येथील दुर्गामाता मंडळाने प्रथम मंडळाने प्रथम क्रमांक तर कुरुंदवाड येथील मंडळाने द्वितीय, हेरवाड संघाने तृतीय क्रमांक पटकावला.विजेत्या संघांना वाळवा पंचायत समितीच्या माजी उपसभापती भाग्यश्री शिंदे, माजी नगराध्यक्षा झिनत अत्तार, स्नेहा माळी, रागिणी सावंत यांच्या हस्ते एकवीस हजार, पंधरा हजार, दहा हजार रुपयांची अनुक्रमे बक्षीसे देण्यात आली. जि.म. सह. बँकेचे संचालक वैभव शिंदे हे प्रमुख उपस्थित होते. प्रास्ताविक श्रद्धा लांडे यांनी केले. भाग्यश्री शिंदे यांनी विजेत्या संघांचे अभिनंदन केले.

यावेळी वरदराज शिंदे, सुहास रुगे, शितल चौगुले, राजकुमार रुकडे, सौ. वर्षा देसावळे, सौ.सारिका शिंदे, सौ. वैशाली पाटील, सौ. प्रमिला मिरजकर, सौ. गौरी माने, सौ. कविता पाटील, दिपक थोटे, अमर शेळके, संकेत पाटील, सुरज आटूगडे, रोहित मिरजकर, शिवराज शिंदे-मिरजकर, अभिषेक शेळके, गणेश टोमके, सुमित पाटील, रोहित जाधव यांसह इतर मान्यवर, महिला, युवती व युवक उपस्थित होते. आभार वैशाली डफळे यांनी मानले.