अग्निवीर पदासाठी नवीन भरती सुरू! ‘या’ दिवशी सुरु होणार अर्जप्रक्रिया!

तुम्ही जर 12 वी पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत भारतीय वायुसेनेमध्ये ‘वायुसेना अग्निवीर’ पदांच्या विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

त्यामुळे आता तुम्ही वायुसेना अग्निवीर पदाची पात्रता पूर्ण करत असाल तर तात्काळ आपला अर्ज दाखल करा. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. त्यामुळे आता 12 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची ही उत्तम संधी असणार आहे.

संस्थेचे नाव : भारतीय वायु सेना

रिक्त असलेले पद : वायुसेना अग्निवीर

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 08 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 जुलै 2024 वयोमर्यादा : 17.5 ते 21 वर्षे

शैक्षणिक पात्रता

12 वी विज्ञान शाखेतून (गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजीसह किमान 50% गुणांसह उत्तीर्ण) किंवा अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम किमान 50% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. विज्ञान विषयांव्यतिरिक्त : किमान 50 टक्के गुणांसह 12 वी / इंटरमिजिएट उत्तीर्ण किंवा दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण.

या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करायचा आहे. इतर माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

अधिकृत वेबसाईट

https://indianairforce.nic.in/ ला भेट द्यावी.