आमदार आवाडे यांच्याकडून दखल….

इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात कुत्र्याने चावा घेतलेल्या रुग्णास रेबीज लस उपलब्ध नसल्याचे सांगून कोल्हापूर अथवा सांगलीला जाण्याचा सल्ला देण्याची घटना डॉक्टरांकडून घडली.युवा महाराष्ट्र सेनेचे सॅम आठवले यांनी याची तक्रार अधीक्षकांकडे केल्यानंतर याची गंभीर दखल घेत डॉक्टर व लस नाही, असे सांगणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तक्रारीनंतर तातडीने लस उपलब्ध करून देण्यात आली.

रुग्णांना रेबीज लस मिळत नसल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांतून प्रसारित झाला होता. त्याची गांभीर्याने आमदार राहुल आवाडे यांनी दखल घेतली. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका भाग्यरेखा पाटील यांना संबंधित घटनेचे गांभीर्य सांगितले. तसेच नाराजी व्यक्त केली. डॉ. पाटील यांनी संबंधित डॉक्टरांवर कारणे दाखवा नोटीस बजावली.