एमक्युअर फार्मास्यूटिकल्स (Emcure Pharmaceuticals) या कंपनीचा आयोपीओ येणार आहे. 3 जुलैपासून गुंतवणूकदार या आयपीओत पैसे गुंतवू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार या कंपनीने आयपीओचा किंमत पट्टाही (प्राईस बँड) ठरवलेला आहे. या आयपीओच्या मदतीने एमक्युअर फार्मास्यूटिकल्स एकूण 1952.03 कोटी रुपये उभे करण्याच्या प्रयत्नात आहे. या आयपीओच्या माध्यातून एकूण 800 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर जारी केले जाणार आहेत.
तर 1152.03 कोटी रुपयांचे शेअर ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून जारी केले जातील. एमक्युअर फार्मास्यूटिकल्स (Emcure Pharma) या कंपनीने आपल्या आयपीओसाठी किंमत पट्ट्याची घोषणा केली आहे. 10 रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या शेअरसाठी 960 ते 1008 रुपये असा किंमत पट्टा ठेवण्यात आला आहे. तुम्हाला या कंपनीत गुंतवणूक करायीच असेल तर कमीत कमी 14 शेअर्सचा एक लॉट घ्यावा लागेल. किरकोळ गुंतवणूकदार कमीत कमी 14 शेअर्सचा एक लॉट आणि जास्तीत जास्त 196 शेअर्सचे 14 लॉट्सवर बोली लावू शकतो.
किरकोळ गुंतवणूकदार या आयपीओमध्ये 14,112 रुपयांपासून 1,97,568 रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. या कंपनीचे शेअर BSE आणि NSE वर लिस्ट होणार आहेत. या आयपीओसाठी कंपनीने कोटक महिंद्रा बँक कॅपिटल कंपनी लिमिटेड, जेपी मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, जेफरीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि अॅक्सिस कॅपिटल लिमिडेट यांना बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त केलं आहे.
आयपीओच्या माध्यमातून जमा करण्यात आलेल्या रकमेतून 600 कोटी रुपयांच्या माध्यमातून कंपनी कर्ज फेडणार आहे. मार्च 2024 पर्यंत या कंपनीवर 2,091.90 कोटी रुपयांचे कर्ज झालेले आहे. तर उर्वरित रकमेचा वापर अन्य कार्यालयीन कामासाठी केला जाणार आहे.